top of page
Writer's pictureShiv CDC

दहावीत 90 टक्क्यांहुन अधिक गुण मिळवणाऱ्या वरळी मधील गरजू विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

Updated: Sep 15, 2021

ज्या मुलांनी आपल्या आर्थिक परिस्थिती वर मात करून, मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे आणि ज्यांना सायन्स फिल्डमध्ये जायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहोत.

कोरोनाची ही महामारी सध्या सर्वानाच मारक ठरली आहे, अशा परिस्थितीत सर्व पालकांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे. यामुळेच बरेच विद्यार्थी विज्ञान शाखा सोडून वेगळ्या शाखाकडे वळून आयुष्याची दिशाच बदलू पाहत आहेत. हि गोष्ट आपल्या मुलांच्या भविष्यासाठी धोकादायक आहे.


यामुळे दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळण्याची अपेक्षा असलेले आणि आर्थिकदृष्ट्या मागास असणार्या वरळी, करी रोड, लालबाग, भायखळा, चिंचपोकळी,आग्रीपाडा, माझगाव, सातरस्ता, महालक्ष्मी मधील होतकरू विद्यार्थ्यांना आम्ही विज्ञान शाखेसाठी मोफत शिकवणी उपलब्ध करून देणार आहोत.


सदर शिकवणी म्हणजेच शिव सायन्स क्लासेस अत्यंत प्रसिद्ध असून इथे अनेक डॉक्टर,इंजिनियर, पाठ्यपुस्तकांचे लेखक व नामांकित प्राध्यापक शिकवतात. मागील वर्षी या शिकवणीला अर्थसंकेत या वृत्तपत्रामार्फत महापौरांच्या हस्ते "नाविन्यपूर्ण क्लासेस २०१९" या पारितोषिकाने गौरविण्यात देखील आले होते.


दक्षिण मुंबईतील शिव सायन्स क्लासेस या प्रतिष्ठीत क्लासेसतर्फे सदर उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भायखळा पश्चिम रेल्वे स्टेशन जवळ व वरळी बी डी डी ५३ / १९ या क्लासेसच्या शाखा आहेत. दहावीनंतर ज्यांना सायन्स फिल्डमध्ये जायचे आहे आणि हालाखीच्या परिस्थितीमुळे क्लासेसची फी परवडत नसेल अशा निवडक गरजू विद्यार्थ्यांसाठीच हा उपक्रम असल्याचे क्लासचे प्रबंधक राणी जयस्वाल मॅडम सांगतात. याचप्रमाणे जर विद्यार्थ्याने उत्तम प्रगती केल्यास आम्ही त्या विदयार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्यास देखील तयार आहोत.


तुम्हाला ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळण्याची अपेक्षा असल्यास तसेच आर्थिक परिस्थिती हालाखीची आणि महत्वाचे विज्ञान शाखेत करिअर करण्याची इच्छा असल्यास आमच्या शाखेतील राणी मॅडमला ९९८७८७०४८७/ ९९६७८०९९८८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



आमचं संकेत स्थळ : www.shivcdc.com



94 views0 comments

Comments


bottom of page